शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 27 जानेवारी 2020 (12:43 IST)

मर्सिडीजमधून उतरणाऱ्यांनाही शिवभोजन थाळी मिळेल- आदित्य ठाकरे

"शिवभोजन थाळी कोणतेही निकष न लावता सर्वांसाठी आहे. बस आणि मर्सिडीजमधून उतरलेल्यांनाही याचा आस्वाद घेता येईल," असं विधान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.  
 
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुंबई उपनगर महसूल कर्मचारी उपहारगृह येथे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ झाला. या योजनेअंतर्गत नागरिकांसाठी 10 रुपयांत आहार मिळणार आहे.
 
उद्घाटनानंतर बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं, की राज्यात आमची सत्ता येताच गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी आणणार, अशी घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्या घोषणेनुसार राज्यात शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला.
 
आदित्य ठाकरेंनी म्हटलं, "पोटाला जात, पात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. शिवभोजन थाळी प्रत्येकासाठी आहे. ज्याला भूक लागली त्याला ही थाळी मिळेल. त्यासाठी कुठेही आर्थिक स्थिती, जात आणि धर्माची अट नाही. ज्याला भूक असेल त्याला थाळी मिळेल. मर्सिडीज किंवा बसमधूनही उतरलेला असेल आणि ज्याला भूक असेल त्याला ही थाळी मिळेल."