बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 27 जानेवारी 2020 (10:35 IST)

नरेंद्र मोदींसाठी काँग्रेसनं Amazonवरून ऑर्डर केली संविधानाची प्रत

काँग्रेसने 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भारतीय संविधानाची प्रत ऑर्डर केली आहे. 'देशाचं विभाजन करण्यातून वेळ मिळाला, तर संविधानही वाचा,' असा उपरोधात्मक सल्लाही काँग्रेसनं मोदींना दिला.
 
काँग्रेसने Amazonवर संविधानाची ऑर्डर करताना चक्क 'पे ऑन डिलिव्हरी'चा पर्याय निवडला. त्यामुळे संविधानाची प्रत मिळाल्यावर याचं पेमेंटही मोदींनाच करावं लागणार आहे .
 
काँग्रसच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता यांनी 'Amazon'वरुन पंतप्रधानांसाठी संविधानाची प्रत ऑर्डर केली असून त्याची किंमत 170 रुपये आहे. ही प्रत केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर पाठवण्यात आली आहे.