सोमवार, 24 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पृथ्वीराज चव्हाणांकडे काँग्रेसनं महत्त्वाची जबाबदारी

Prithviraj Chavan has important responsibility of the Congress
मध्य प्रदेश जाहीरनामा अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी चव्हाण यांची निवड केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी जाहीरनामा पाच राज्यांसाठी अंमलबजावणी समिती स्थापन केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगड, पुदुच्चेरीसाठी काँग्रेसनं प्रत्येकी एक समिती तयार केली आहे. यापैकी मध्य प्रदेशच्या समितीचं कामकाज पृथ्वीराज चव्हाण पाहतील. 
 
अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षपदांवर काँग्रेस नेतृत्त्वानं वरिष्ठ नेत्यांची निवड केली आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे पंजाबची, माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांच्याकडे छत्तीसगड, वीरप्पा मोईलींकडे पुद्दुचेरीची, तर लोकसभेतले खासदार ताम्राध्वज साहू यांच्याकडे राजस्थानच्या समितींच्या अध्यक्षपद देण्यात आलं आहे.