गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By

सिद्धीविनायकाला सोन्याचा साज, भक्ताकडून तब्बल 35 किलो सोनं दान

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराचा लवकरच देशातील सगळ्यात श्रीमंत मंदिराच्या यादीमध्ये समावेश होणार आहे. दिल्लीतील एका भक्ताने सिद्धीविनायकाच्या चरणी तब्बल 35 किलो सोनं दान केलं आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून सिद्धीविनायकाचे मंदिर शिंदूर लेपनासाठी बंद होते. या दरम्यान नवस पूर्ण झालेल्या एका भाविकाने विघ्नहर्त्याच्या चरणी 35 किलो सोनं दान केलं आहे. या सोन्याची किंमत 14 कोटी आहे. गणपती बाप्पाच्या चरणी एवढं सोनं चढवणाऱ्या भक्ताची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. भक्ताने दिलेल्या या सोन्याच्या दानातून मंदिराचा गाभारा, घुमट, दरवाजा यासह इतर गोष्टींना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहेत.