शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिर्डीच्या वादावर पडदा, आंदोलन मागे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शिर्डीच्या शिष्टमंडळाने समाधान झाल्याचं म्हणत, आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका जाहीर केली. शिर्डीचे भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, “शिर्डींच्या ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. शिर्डीची आणि ग्रामस्थांची भूमिका बैठकीत मांडली. शिर्डी ग्रामस्थांचं समाधान झालेलं आहे. त्यामुळे शिर्डीतील आंदोलन मागे घेण्यात आले आहे”, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
 
शिर्डी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी जन्मस्थळाबाबतचं वक्तव्य मागे घेतलं. तर पाथरीच्या तीर्थस्थळ विकासालाही निधी देण्याचं मंजूर करण्यात आलं. या दोन मुद्द्यावरुन आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका शिर्डीकरांनी जाहीर केली.