शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जानेवारी 2020 (15:08 IST)

मुख्यमंत्र्यांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली भाजप नेते - विखे पाटील

साईबाबांच्या जन्मस्थळावरुन सुरु झालेल्या वादामुळे उद्या शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर त्या भागाचे लोकप्रतिनिधी या नात्याने आज राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. परभणी जिल्ह्यात पाथरीला साईबाबांचे जन्मस्थान घोषित करण्याची मागणी होत आहे त्यावरुन हा वाद सुरु झाला आहे.
 
मुख्यमंत्र्यांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली. बाबांच्या जन्मस्थळाबद्दल पाथरीत कोणतेही पुरावे नाहीत. ब्रिटिशकाळातही वाद झाला पण त्याचे पुरावे मिळाले नाहीत. साईंच्या जन्मस्थळाचा वाद वाढवू नये. कोटयावधी साई भक्तांच्या भावना दुखावल्या त्याची दखल सरकारने घ्यावी. साई संस्थानने पुढाकार घेऊन गैरसमज दूर करावा असे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.
 
या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून शिर्डी बंदला माझा पाठिंबा आहे. शिर्डी बंद राहणार असले तरी, साई मंदिर आणि भक्तनिवास खुले राहणार आहे. २५ गाव या बेमुदत बंदमध्ये सहभागी होतील. हॉटेलमध्ये बुकिंग केलेल्या नागरीकांची तसेच विमानाने येणाऱ्याची कुठलीही गैरसोय होणार नाही फक्त बाजार बंद राहील. अत्यावश्यक सेवांना या बंदमधून वगळण्यात आले आहे अशी माहिती विखे-पाटील यांनी दिली.
 
महाराष्ट्रात सुद्धा एनआरसी कायदा लागू होऊ देणार नसल्याचे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण   
 
देशभरात नागरिकत्व कायद्याला विरोध केला जात असून अनेक राज्यांनी या कायद्याची अमलबजावणी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यातच आता महाराष्ट्रात सुद्धा एनआरसी कायदा लागू होऊ देणार नसल्याचे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. नांदेड येथील सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आले असता ते बोलत होते.
 
यावेळी चव्हाण यांनी नागरिकत्व कायद्याला विरोध करत भाजपवर निशाणा साधला. देशातील प्रत्येक नागरिकाला या देशात राहण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार अधिकार आहे. मात्र भाजपकडून जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करून अल्पसंख्यांकामध्ये भीतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला..