सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 20 जानेवारी 2020 (16:37 IST)

सध्याचे सरकार अमर, अकबर, अँथोनीचे : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची टीका

सध्याचे राज्य सरकार हे अमर, अकबर आणि अँथोनीचे सरकार आहे. यांच्यात एकवाक्यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ चालणार नाही. महायुतीच्या काळातील अनेक चांगल्या योजनांना ब्रेक लावू पाहणारे हे ब्रेक सरकार आहे. चांगल्या योजना बंद करणऐवजी त्यांनी त्याहून अधिक चांगल्या योजना आणून त्याची अंलबजावणी करावी, असे आव्हान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारला दिले.
 
काही कार्यक्रमांनिमित्त नाशिक दौर्‍यावर आलेल दानवे यांनी भारतीय जनता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीच्या सरकारने अनेक चांगल्या योजना आणल्या. त्यांची अंलबजावणीही सुरू केली. परंतु महाविकास आघाडीचे सरकार या योजना पुढे घेऊन जाण्याऐवजी ब्रेक करू पहाते आहे. त्यामुळे हे अमर, अकबर अँथोनींचे ब्रेक सरकार आहे. या सरकारमध्ये समाविष्ट असलेले पक्ष आणि नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोण व तत्सम इतिहास उकरून काढत हे सरकार बेरोजगारी, महागाई यासारख्या प्रश्नांपासून सर्वसामन्यांचे लक्ष विचलीत करीत आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न बाजूला पडत आहेत.
 
परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून हे सरकार निराशा करत असल्याचे लोकांच लक्षात येईल. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.