बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जानेवारी 2020 (10:04 IST)

प्रसिद्ध चित्रकार अकबर पदमसी यांचं निधन

भारतातील प्रसिद्ध चित्रकार अकबर पदमसी यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील वरळीला वास्तव्यास असलेले अकबर पदमसी हे काही दिवस कोइम्बतूरजवळील आश्रमात राहायला गेले होते, तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  
 
मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महिविद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पॅरिसमधून उच्चशिक्षण पूर्ण केलं. पाश्चात्य शैलीनं चित्र रंगवण्यासाठी ते विशेषत: ओळखले जात. 1951 सालापासून त्यांची चित्रकारकीर्द बहरत गेली.
 
ललिता कला अकादमीचा कलारत्न पुरस्कार, तसंच मध्य प्रदेशच्या कालिदास सन्मानानं अकबर पदमसी यांचा गौरव झाला आहे.