सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जानेवारी 2020 (09:52 IST)

'महाराष्ट्र केसरी'तून बाला रफिक शेख, अभिजीत कटके बाहेर

महाराष्ट्र केसरी कुस्ती आखाड्यात यंदा महाराष्ट्राला नवा विजेता मिळणार आहे. लातूरचा शैलेश शेळके आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर हे दोन कुस्तीपटू यंदा अंतिम फेरीत दाखल झालेत.
  
माती विभागाच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या माऊली जमदाडेनं गतविजेता बाला रफिक शेखला चितपट केलं आणि अंतिम फेरी गाठली, तर 2018 च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता अभिजीत कटके याला मॅट विभागाच्या अंतिम फेरीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं चितपट केलं.
 
विशेष म्हणजे शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर हे दोघेही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे पैलवान असून, अर्जुनवीर काका पवारांचे पठ्ठे आहेत. आता काका पवारांच्या या दोन शिष्यांमध्ये आज (7 जानेवारी) पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात अंतिम फेरी पार पडेल आणि राज्याला नवा महाराष्ट्र केसरी मिळेल.