गुरूवार, 12 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अदनान सामीला पद्मश्री दिल्याबद्दल कॉंग्रेसकडून विरोध

गायक अदनान सामीला पद्मश्री दिल्याबद्दल कॉंग्रेसने प्रश्न उपस्थित करून हा पुरस्कार मिळविण्यासाठी भाजपाची चमचेगिरी करणे हा मापदंड झाला असल्याची टीका केली आहे. पार्टीचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी कारगिल युद्धात सामील झालेल्या सैनिक सनाउल्लाहला घुसखोर घोषित का करण्यात आले, हा प्रश्न उपस्थित केला आहे.
 
पद्म सन्मान दिल्या जात असलेल्या सामीच्या वडिलांनी पाकिस्तानच्या वायुसेनेत राहून भारताविरुद्ध गोळीबार केला होता. शेरगिल यांनी एक व्हिडीओ जारी करून भारतीय सेनेचे शूर शिपाई आणि भारतमातेचे पुत्र मोहम्मद सनाउल्लाह यांनी पाकिस्तानविरुद्ध कारगिलची लढाई लढली. त्यांना एनआरसीच्या माध्यमातून घुसखोर घोषित करण्यात आले. दुसरीकडे अदनान सामीला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्याचे वडील पाकिस्तानच्या वायुसेनेत आॅफिसर होते आणि भारताविरुद्ध गोळीबार केला होता.