1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By

डीजेच्या तालावर नाचतांना हृदय विकाराचा झटका, तरुणाचा मृत्यू

man dies
उल्हासनगर येथे लग्नानिमित्ताने आयोजित केलेल्या हळदी समारंभात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. डीजेच्या तालावर नाचता नाचता या तरूणाला हृदय विकाराच्या झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
 
अर्शद असलम शेख (२५) असे मृतक तरुणाचे नाव आहे. उल्हासनगर शहरातील कॅम्प नं.३ येथील ओटी सेक्शन परिसरात एक हळदी सभारंभात होता. या हळदी समारंभात डीजेच्या तालावर नाचत असताना अर्शदच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी त्वरीत मध्यवर्ती शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत झाल्याचे घोषित केले.