मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2019 (17:52 IST)

लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू नव आयुष्याचे स्वप्न अधुरे राहिले

बीड जिल्ह्यात एक वाईट घटना घडली आहे. लग्नाच्या आनंदावर विरजण पाडणारी एक दुर्दैवी घटना म्हणता येतील. लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशीच नवरदेवाचा हृदय विकाराने अकाली मृत्यू झाला आहे. त्यामुळे नव वधूचे एक नवीन आयुष्य सुरु करण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. 
 
अशोक करांडे (वय-२७) असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव असून, वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील रहिवासी होते. नागपूर येथे अशोक हे कंपनीत नोकरीस होते. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत. तर त्यांना एक भाऊ आणि दोन बहिणी असा त्यांचा परिवार आहे. अशोकचे लग्न 21 मे रोजी माजलगाव तालुक्यातील खेर्डा येथे थाटात पार पडले होते. घरी आल्यावर हे नवदांपत्य सुखरुपरीत्या देवदर्शन घेऊन आले होते. त्यानंतर बहिणीच्या मुलांना कपडे खरेदी करण्यासाठी सर्व जेव्हा जात होते तेव्हा अशोक यांना अचानक भोवळ आली व ते दुचाकीवरुन कोसळले होते. यानंतर जवळच असलेल्या  नागरीकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे नव वधूने पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले आहे.