मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जानेवारी 2020 (16:15 IST)

स्टिरॉईडचे अतिसेवन, तरुणाचा गेला जीव

बॉडीबिल्डर होण्याची इच्छा असलेल्या नावेद जमील खान (२३) या तरुणाचा स्टिरॉईडचे अतिसेवन केल्याने मृत्यू झाला आहे. तो मुंब्रा येथे वास्तव्यास होता. ठाणे शहरातील शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी होणार होता त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.
 
नावेदला शुक्रवारी रात्री ताप आला होता. यानंतर त्याच्या कुटुंबाने त्याला स्थानिक डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्यानंतर कुटुंबीयांना नजीकच्या बिलाल रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी केलेल्या चाचण्यांमधूनही धक्कादायक माहिती समोर आली. नावेदला हिपॅटायटीस बी हा आजार होता हे निष्पन्न झालं. तसेच खानच्या शरिरामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही अधिक असल्याचे समजले. व्यायाम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या औषधांमधील ग्लुकोकॉट्रीकॉइड्स या संप्रेरकांमुळं शरिरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.