बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 6 फेब्रुवारी 2020 (10:13 IST)

ही लढाई आहे… मनसेच्या महामोर्चाचा टीझर प्रदर्शित

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे येत्या ९ फेब्रुवारीला बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढणार आहे. मनसे या मोर्चासाठी जोरदार तयारी करत आहे. महामोर्चात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करणारे होर्डिंग्स मुंबईत झळकू लागले आहेत. सोबतच मनसेने वातावरण निर्मितीसाठी महामोर्चाचा पहिला टिझर रिलीज केला आहे.चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर मनसे महामोर्चातून शक्तिप्रदर्शन करणार आहे. आझाद मैदान येथे पोलिसांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी ऑगस्ट २०१२ मध्ये राज ठाकरे यांनी गिरणगावात चौपाटी ते आझाद मैदान मोर्चा काढला होता आणि आता तब्बल ८ वर्षांनी मुंबईच्या रस्त्यावर राज ठाकरे पुन्हा एकदा पक्षातर्फे आयोजित महामोर्चचे नेतृत्व करणार आहेत.
 
असा निघणार मोर्चा 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार ९ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता मनसेचा मोर्चा निघणार आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरुन मोर्चा निघणार आहे.