सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 6 फेब्रुवारी 2020 (16:25 IST)

माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांची छेडछाड, संशयीत ताब्यात

मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांची छेडछाड काढत विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र महिलांनी कोणतीही तक्रार दाखल न केल्याने फक्त चोरीचा गुन्हा दाखल होत. हा व्यक्ती रेल्वे स्थानकावर महिलांना स्पर्श करताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. पुढे  तो हस्तमैथून देखील करत होता. दोन महिलांना पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पण त्यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. रजिऊर खान असं या विकृताचं नाव आहे.
 
२५ जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो एका महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे. यानंतर तो आजुबाजूला कोणी नाही याची खात्री करुन घेतो आणि महिलेकडे पाहून हस्तमैथून करण्यास सुरुवात करतो. यानंतर २६ जानेवारीला खान पुन्हा एकदा त्याच महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे. यावेळी तो जबरदस्ती तिचा किस घेतो आणि पळ काढतो.