रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 6 फेब्रुवारी 2020 (15:51 IST)

राममंदिरासाठी मोदी सरकारचे 'पुढचे पाऊल'

मुख्यमंत्री उध्दव आणि राज ठाकरे यांनी केले स्वागत
अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी श्रीरामजन्भूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयासाठी त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

मंत्रिमंडळाने श्रीरामजन्भूमी तीर्थक्षेत्र ह्या ट्रस्टच्या  स्थापनेला मंजुरी दिली गेली. या निर्णामुळे अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल, अशी अपेक्षा राज यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे.