‘चंद्रयान-2’ मोहिम, संपकासाठी प्रयत्न सुरु, नासाने ‘हेलो’ मेसेज पाठवला
‘चंद्रयान-2’ मोहिमेतील ‘विक्रम लँडर’शी अद्यापही संपर्क झालेला नाही. आता याकामी अमेरिकीची अंतराळ संशोधन संस्था नासानेही विक्रमशी संपर्क साधण्यासाठी ‘हेलो’ मेसेज पाठवला आहे. नासाने डीप स्पेस नेटवर्कच्या जेट प्रपल्शन लेबोरेटरी मधून विक्रम लँडरला रेडियो संदेश पाठवला. नासाच्या सूत्रांनुसार, इस्रोच्या सहमतीनंतर विक्रम लँडरशी संपर्क करण्यासाठी रेडिओ संदेश पाठवला आहे.
इस्रोच्या अंदाजानुसार, विक्रमला फक्त एका ल्युनर डेसाठीच सरळ सुर्यप्रकाश मिळेल. म्हणजेच 14 दिवसांपर्यंत विक्रमला सूर्यप्रकाश मिळेल. त्यामुळे इस्रो 14 दिवसांपर्यंत आपले प्रयत्न सुरु ठेवू शकतो. जर इस्रोला विक्रमच्या कम्युनिकेशन इक्विपमेंटला नुकसान झाल्याची माहिती मिळाली तर तो 14 दिवसांच्या अगोदरही प्रयत्न थांबवू शकतो.
14 दिवसांनंतर एक मोठी रात्र असेल. जर लँडरने सॉफ्ट लँडिंग केली असतीस, तरी या रात्रीत वाचणे त्याला शक्य झालं नसतं. विक्रमला चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग करुन आता 6 दिवस झाले आहेत. अशा वेळी 20-21 सप्टेंबरपर्यंत जर विक्रमशी संपर्क झाला नाही तर त्याच्याशी संपर्क होण्याची आशाही उरणार नाही.