गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 डिसेंबर 2025 (19:30 IST)

ठाण्यातील खासगी बंगल्यात दारू पार्टीदरम्यान हाणामारी, एकाची हत्या

crime
ठाण्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील पेठर येथील पंचवटी नावाच्या खासगी बंगल्यात दारू पिऊन दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात डोक्याला जबर मार लागल्याने एकाचा मृत्यू झाला.
वर्तक नगर पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली आरोपी राजनारायण यादवला अटक केली आहे. तर भानूप्रसाद सिंग यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला राजनारायण यादव (२७) हा बंगला पाहत असे. बंगल्यात कोणीही नसल्याने त्यांनी त्यांच्या मित्र भानूप्रसाद सिंग यांना बोलावून घेतले. दोघांनी दारू पार्टी केली. नंतर शिवीगाळ आणि हाणामारी करत राजनारायण यादव याने भानू प्रसाद यांच्या डोक्यावर मॉपच्या हँडलने जोरदार प्रहार केला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वर्तक नगर पोलीस तेथे पोहोचले, त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविला. व राजनारायण यादवला पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली अटक केली.