रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑगस्ट 2019 (09:50 IST)

पाकिस्तानला यूनिसेफने सडेतोड उत्तर, प्रियांकाचे केले समर्थन

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या सदिच्छा दूत’पदावरुन हटवा, अशी मागणी करणाऱ्या पाकिस्तानला यूनिसेफने सडेतोड उत्तर दिले आहे.   
 
जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतरपाकिस्तानातील मानवी हक्क खात्याचे मंत्री शिरीन मझारी यांनी युनिसेफला पत्र लिहून प्रियांका चोप्राला सदिच्छा दूत या पदावरून हटवण्याची मागणी केली. या पत्राला उत्तर देत संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्त्यांनी प्रियांकाचे समर्थन केले. संयुक्त राष्ट्र सदिच्छा दूत प्रियांका चोप्राला कोणत्याही मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट मत युनिसेफने व्यक्त केले. 
 
संयुक्त राष्ट्र महासंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी प्रियांकाचे वैयक्तिक विचार किंवा तिची कामे यूनिसेफशी जोडून पाहू शकत नाही. जर ती यूनिसेफडून बोलते तर आम्ही प्रियांकाला यूनिसेफच्या नियम पाळण्यासंदर्भात अपेक्षा करू शकतो.' असे म्हटले आहे.