बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

लग्नापासून पळ काढत आहे येथील लोक, दुसरं मुलं जन्माला घालण्यासाठी सरकारचा दबाव

चीन येथे घटस्फोटाचे प्रकरण वाढत असून येथील लाखो तरुण लग्नाला नकार देत आहे. तसेच कोरियामध्ये लग्न होत नसल्यामुळे आर्थिक संकट वाढत चालले आहे. जपानमध्ये महिलांवर दुसरं मुलं पैदा करण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे.
 
हल्लीचे तरुण स्वतंत्र जगणं पसंत करत आहे त्यांना कोणतेही बंधन नको अशात नवीन पिढी तयार कशी होणार अशा प्रश्न काही देशांना पडत आहे. हल्ली तरुणांमध्ये घटस्फोट घेण्याची वृत्ती मागील पिढीपेक्षा तीन पटीने वाढली आहे. तसेच 70 टक्के तरुण आवडता पार्टनर मिळत नाही म्हणून लग्नाला तयार होत नाही. अनेक तरुण तर लग्न करायचंच नाही या ठाम मतावर टिकून आहेत.
 
चीन सर्वात अधिक लोकसंख्या असलेला देश असली तरी येथील तरुण लोकसंख्या भारताच्या तरुण लोकसंख्येपेक्षा कमी आहे. चीनला तरुण एकटे राहू इच्छित असल्याच्या विचारामुळे काळजी वाटू लागली आहे. विशेषज्ञांप्रमाणे येथील मुली उच्च शिक्षण प्राप्त करून आर्थिक रूपाने कोणावरही अवलंबून नाही. खरंतर महिलांना पुरुषांच्या कमाईवर अवलंबून राहायचेच नाही. आणि या कारणामुळे सिंगल कँडिडेट्सचे प्रमाण वाढत चालले आहे. पूर्वी लोक म्हातारपणी आपली काळजी कोण घेणार अशी वृत्ती ठेवून लग्न करून मुलांना जन्म देत होत्या परंतू आता सोशल आणि मेडिकल इंश्योरेंस असल्यामुळे लग्नाची गरज भासत नाही.
 
तसेच कोरिया येथे देखील तरुण लग्नापासून लांब होत आहे. येथे अनेक महिला संघटन आहेत ज्या लग्न आणि मातृत्व यापासून लांब होत आहे. यामुळे कोरियात आर्थिक संकट पैदा होत आहे. कोरिया जगात सर्वात कमी बर्थ रेट असलेल्या देशात सामील असून येथे बर्थ रेट कपातीमुळे लेबर क्राइसि‍स पैदा झाले आहे. परिस्थिती अशी झाले आहे की आता येथे सरकार लग्न करून वडील होण्यासाठी इंसेटिव्ह देत आहे. येथे मॅरिज हॉल, शाळा देखील बंद पडत आहे कारण शिक्षण घेणार्‍या मुलांची चांगल्याच प्रमाणात कपात झाली आहे. येथे अनेक लोकांची लग्न न करण्याची मोहीम देखील सुरू आहे.
 
तसेच जपानमध्ये लोकसंख्या आता वयस्कर होत आहे. याने समाज आणि अर्थव्यवस्था यावर प्रभाव दिसून येत आहे. येथील तरुण देखील लग्नापासून पळ काढत आहे. कमी मुले आणि कमी तरुण देशासाठी संकट असल्यामुळे येथे महिलांवर दुसरं मुलं जन्माला घालण्यासाठी दबाव टाकला जात आहे.