शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काय सऊदीत जारी केला गेला फतवा- ‘भूक लागल्यावर आपल्या पत्नीला खाऊ शकतात पती’...

सोशल मीडियामध्ये एक पोस्ट काही दिवसांपासून व्हायरल होत आहे की सऊदीच्या एका मुफ्ती यांनी एक विचित्र फतवा जारी करत म्हटले आहे की भूक लागल्यावर पती आपल्या पत्नीला खाऊ शकतो. या दाव्यासह कथित मौलवी आणि ‘द मिरर’ ची बातमी एका फोटोच्या माध्यमाने शेअर केली जात आहे.
 
काय आहे व्हायरल पोस्ट
फेसबुक पेज We Support Republic वर दर्शन भवसार नावाच्या यूजरने एक पोस्ट शेअर केली- हे विश्वातील शीर्ष मुस्लिम मौलवी आहे! अजीज बिन अब्दुल्ला। याने फतवा जारी करत म्हटले की ‘भूक लागल्यावर आपल्या पत्नीला खाता येऊ शकतं.
 
खरं काय
वेबदुनियाने सर्वात पहिले ‘द मिरर’ ची बातमी शोधून काढली, तर कळलं की ही बातमी वर्ष 2015 साली प्रकाशित केली गेली आहे. या बातमीमध्ये फतवा याबद्दल लिहिले आहे की पती आपल्या पत्नीला भूक लागल्यावर खाऊ शकतो.
सोबतच, आम्ही 'इंडिया टुडे' ची 2015 ची एक रिपोर्ट देखील सापडली ज्यात शेवटल्या टप्प्यात लिहिले होते की मुफ्ती यांनी या प्रकाराचा कोणताही फतवा काढण्याचे नाकारले आहे. रिपोर्टप्रमाणे या फतव्याची गोष्ट व्यंग्यात्मक पद्धतीने प्रस्तुत करण्यात आली होती.
 
हा फतवा मोरक्कोच्या एका व्यंग्यकार ब्लॉगर इसराफेल अल-मगरिबी यांचं एक सटायर आर्टिकल होतं. आणि ही बातमी पसरत गेली.
 
वेबदुनिया तपासणीत ही व्हायरल बातमी एक व्यंग्यात्मक लेख होता ज्याला 2015 साली नाकारले गेले होते तरी आता हे सोशल मीडियावर शेअर केलं जातं आहे.