testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लिबियाच्या समुद्रकिनारी शरणार्थ्यांच्या जहाजाला जलसमाधी, 150 जण बुडाल्याची भीती

लिबियाच्या समुद्रकिनारी शरणार्थ्यांचं जहाज बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 150 जणांना जलसमाधी मिळाली असल्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी एजन्सीने (UNHCR) व्यक्त केली आहे.
इतर 150 शरणार्थींना स्थानिक मच्छिमारांनी वाचवलं. लिबियाच्या तटरक्षक दलाच्या जवानांनी या 150 जणांना किनाऱ्यापर्यंत सुखरूप पोहोचवलं असल्याची माहिती यूनएनएचसीआरने दिली.

हे सर्व शरणार्थी एकाच जहाजात होते की वेगवेगळ्या जहाजात होते, हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये.

लिबियाच्या राजधानीपासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरातून हे जहाज प्रवासासाठी निघालं होतं.
"लिबियात सध्या संघर्ष सुरू आहे आणि तिथे शरणार्थींना अमानवी पद्धतीने वागवलं जात आहे. त्यामुळे ज्या लोकांना भूमध्यसागरातून वाचवलं जातं, त्यांना पुन्हा लिबियात पाठवणं योग्य नाही," असं संयुक्त राष्ट्राकडून सातत्याने सांगण्यात आलं आहे.

ट्युनिशियात मे महिन्यात समुद्रकिनारी जहाज बुडून सुमारे 65 जणांना जलसमाधी मिळाली होती. या दुर्घटनेतून वाचलेल्या 16 जणांना ट्युनिशियाच्या नौसेनेच्या जवानांनी किनाऱ्यापर्यंत आणलं होतं.
दरवर्षी हजारो शरणार्थी भूमध्यसागर पार करण्याचा प्रयत्न करतात. यातील बहुतांश शरणार्थी लिबियातील असतात.

शरणार्थ्यांना घेऊन प्रवास करणारी जहाजं अनेकदा बिकट अवस्थेत असतात. शिवाय जहाजांवर मर्यादेपेक्षा जास्त लोक चढतात. त्यामुळेही दुर्घटनेच्या घटना वाढतात.

2017 मध्ये शरणार्थींच्या स्थलांतराचं प्रमाण नाट्यमयरित्या कमी झाल्याचं पाहायला मिळालं. याचं कारण लिबियाच्या सैनिकांच्या मदतीने इटली शरणार्थींच्या स्थलांतराला रोखण्याचं काम करते आहे. समुद्रात शरणार्थी सापडल्यास पुन्हा लिबियात पाठवलं जात आहे.
जगभरातील मानवाधिकार संस्था इटली आणि लिबियाच्या या धोरणांवर टीका करत आहेत.

यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात जवळपास 15 हजार 900 शरणार्थी भूमध्यसागरातील तीन मार्गांनी युरोपात आले. शरणार्थींच्या स्थलांतराची 2018 सालातील आकडेवारी पाहता, ही संख्या 17 टक्क्यांनी घटली आहे.


यावर अधिक वाचा :

देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' ...

देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
"पाच वर्षं प्रामाणिकपणे काम केलं. आमच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप राज्यात झाला नाही," ...

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला ...

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला जाणार
विधानसभा निवडणुकांआधी कदाचित मी आयोध्येला जाईन, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ...

दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस ...

दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस दोघांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील ...

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली
अखेर मनसेने निवडणुकीचे बिगुल फुंकले, लढवणार विधानसभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ...

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा ...

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा मोठा फायदा
देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रेपो रेट लिंक्ड आधारित ...

आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची तुलना होऊ शकते का?

आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची तुलना होऊ शकते का?
'आजतक' वाहिनीच्या अँकर अंजना ओम कश्यप यांची एक क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत ...

अमिताभ बच्चन यांचा राजकीय प्रवास : राजीव गांधीचे मित्र ते ...

अमिताभ बच्चन यांचा राजकीय प्रवास : राजीव गांधीचे मित्र ते नरेंद्र मोदी सरकारचे जाहिरातकर्ते
MMRDAनं मुंबई मेट्रोच्या प्रसिद्धीसाठी 'मुंबई काही मिनिटांत' या मथळ्याखाली एक जाहिरात ...

प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी पाण्याखाली गेला आणि बुडून मेला

प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी पाण्याखाली गेला आणि बुडून मेला
'शोले' चित्रपटातलं एक दृश्य आठवा! या चित्रपटात हेमामालिनीला मिळवण्यासाठी धर्मेंद्र ...

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांना 'हाऊडी' कार्यक्रमातून ...

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांना 'हाऊडी' कार्यक्रमातून जगाला काय दाखवायचं आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा चर्चेत आहे. गेल्या आठवड्यापासून हाऊडी मोदी या ...

आता व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक स्टोरीमध्येही करा शेअर

आता व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक स्टोरीमध्येही करा शेअर
व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन फीचर आणलं आहे. आता व्हॉट्सअॅप युजर्स थेट व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक ...