1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: कंदाहार , मंगळवार, 16 जुलै 2019 (08:27 IST)

अफगाणिस्तानाच्या कंदहारमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू

11 people die in Afghan terror attack in Kandahar
दक्षिण अफगाणिस्तानच्या भागात कार बॉम्बने घडवून आणलेल्या स्फोटात आकरा जणांचा मृत्यू झाला असून 34 जण जखमी झाल्याची माहिती स्थानीक वृत्तसंस्थेने दिली आहे. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान हा स्फोट घडवून आणला गेला. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने स्विकारली आहे.
 
तालिबानच्या दहशतवाद्यांनी रस्त्यावर सुरूंगा द्वारे हा बॉम्ब पेरला होता. यावेळी लोकांना घेऊन जाणारी एक प्रवासी बस अथवा ट्रक या बॉम्बवरुन गेल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या स्फोटामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता असल्याचे अफगान सैन्याचे प्रवक्ते अहमद सादिक इसा यांनी सांगितले.