सोमवार, 6 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 ऑक्टोबर 2025 (08:23 IST)

सिंधुदुर्ग : शिरोडा-वेलागर समुद्रात एका कुटुंबातील आठ जणांचा बुडून मृत्यू

death
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडावेलागर येथे शुक्रवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली, ज्यामध्ये कुडाळ येथील पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील आठ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे, चार बेपत्ता आहे. अशी माहिती सामोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी बेळगावातील लोंडा येथील कित्तूर कुटुंब आणि कुडाळमधील गुडीपूर येथील मणियार कुटुंब ही दोन कुटुंबे शिरोडावेलागर येथे पर्यटनासाठी आली होती. सदर कुटुंबातील चार सदस्य हात धरून समुद्रात खेळत असताना. सायंकाळी ५:४५ वाजताच्या सुमारास अचानक एका मोठ्या लाटेने त्यातील सात जणांना पाण्यात वाहून नेले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आणि त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि चार अजूनही बेपत्ता आहे. १७ वर्षीय मुलगी ही वाचली आणि तिच्यावर शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.  
 ALSO READ: जेपी दत्ता त्यांच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या बिंदियाच्या प्रेमात पडले, तिच्याशी लग्न केले
स्थानिक बोटींच्या मदतीने अंधार पडेपर्यंत चार बेपत्ता लोकांचा शोध सुरू होता, परंतु ते अद्याप सापडलेले नाहीत. समुद्र खवळलेला आणि अंधार असल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. उद्या पुन्हा शोध सुरू होईल. दरम्यान, मृत व्यक्तीबाबत पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.  
Edited By- Dhanashri Naik