मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोलन , सोमवार, 15 जुलै 2019 (10:27 IST)

हिमाचलच्या सोलनमध्ये इमारत कोसळल्याने मोठा अपघात

हिमाचल प्रदेशातील सोलन या ठिकाणी ढाबा आणि गेस्ट हाऊसची इमारत कोसळून 7 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. सोलनमधील कुमारहट्टी या ठिकाणी रविवारी इमारत कोसळली. त्यानंतर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जणांची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमने मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. लष्कराचीही मदत घेण्यात येते आहे. मृतांमध्ये 6 लष्करी जवानांचा आणि एका नागरिकाचा समावेश आहे.
 
सोलनचे उपायुक्त के. सी चमन यांनीही काही वेळापूर्वीच घटनास्थळी भेट दिली. आत्तापर्यंत 7 जवानांची सुटका करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या दुर्घटनेत 6 जवान आणि 1 नागरिकाचा मृत्यू झाला आहे असेही त्यांनी सांगितले. 7 जवान अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळाला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.