मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जुलै 2019 (16:06 IST)

दुष्काळी मराठवाडा थोडा सुखावला सरासरी 122.13 मि.मी पावसाची नोंद

मुंबई, कोकण, नाशिक, पुणे या ठिकाणी सध्या पाऊस जोरदार पडून थांबला आहे. मात्र दुष्काळग्रस्त असलेला मराठावाडा, विदर्भ, पश्चिम, उत्तर महाराष्ट्रात मात्र चांगला पाऊस होत आहे. यामुळे नागरिक आणि शेतकरी सुखावले आहे. त्यामुळे पेरण्या सुरु झाल्या आहेत. मराठवाडा विभागात मागील 24 तासात नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यात पाऊस झाला. यामध्ये नांदेड येथे सरासरी 15.57 मि.मी, लातूर येथे 4.43 मि.मी, परभणी 12.77 मि.मी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत. मराठवाड्यात आतापर्यंत सरासरी 122.13 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. 
 
औरंगाबादमध्ये 0.10 मिमी, फुलंब्री 0.00, पैठण 0.40, सिल्लोड 0.00, सोयगाव 0.00, वैजापूर 0.60, गंगापूर 0.00, कन्नड 0.50, खुलताबाद 0.00 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर 1 जूनपासून आतापर्यंत औरंगाबाद 144.30 मिमी, फुलंब्री 205.75, पैठण 68.37, सिल्लोड 212.19, सोयगाव 182.67, वैजापूर 142.00, गंगापूर 120.56, कन्नड 130.25, खुलताबाद 102.00 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत जिलह्यात एकूण 145.34 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.