शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुढच्या पिढीला मराठवाड्यात दुष्काळ पाहू देणार नाही

आताच्या पिढीने मराठवाड्यात भीषण दुष्काळ पाहिला. मात्र आता पुढच्या पिढीला मराठवाड्यात दुष्काळ पाहू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिली आहे. औरंगाबादेत दुष्काळी भागाची पाहणी केली. तसेच त्यांनी गंगापूरच्या चारा पाहणीला भेट दिली.
 
दुष्काळ निवारणासाठी राज्याला ४ हजार कोटींची मदत मिळाली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. दुष्काळापासून कायमची मुक्ती मिळावयाची आहे. त्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. विशेषतः जलयुक्त शिवारमुळे दुष्काळातही तुलनेने कमी नुकसान झाले. यंदा पाऊस थोडा जरी पडला तरी शेतकऱ्याला दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
 
गेल्या दोन ते तीन वर्षात जलयुक्त शिवारमुळे पीक उत्पादकता वाढली. कापूस, सोयाबीनची उत्पादकता वाढली आहे. जलयुक्त शिवारमुळे पिके वाचवता आली. या योजनेवर टीका झाली. मात्र जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठी कामे झाली आहे. यामुळे दीर्घकाळ टँकरविना चालू शकलो, असाही दावा त्यांनी केला.