शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (17:13 IST)

मतांच्या मोहापायी सरकारने दिला विद्यार्थ्यांचा बळी

फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्याचे जाहीर केले होते. मात्र वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असून पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची भूमिका संशयास्पद असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मतांच्या मोहापायी सरकारने विद्यार्थ्यांचा बळी दिला, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
 
भाजपकडे कोणत्याच गोष्टीचा लाँग टर्म प्लान नसतो. त्यांच्या फसलेल्या योजना आणि नुकतेच जाहीर झालेले मराठा आरक्षण त्यांचे उदाहरण आहे, असा टोला आ. मुंडे यांनी फडणवीस सरकारला लगावला. निवडणुकांच्या अनुषंगाने आरक्षण जाहीर केले तरी त्याची ठोस अंमलबजावणी सरकारला करता आली नाही. मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला सरकारच जबाबदार आहे. अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी सरकारच्या एकूण कामकाजावर गंभीर ताशेरे ओढले.