शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मे 2019 (16:33 IST)

मुख्यमंत्र्यांकडून केंद्र सरकारला पत्र

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना या वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षण लागू होणार होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय फेटाळला होता. त्यामुळे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांनी ६ मे रोजी मुंबईत येऊन सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी मंत्रालयात जाऊन या विषयावर तोडगा काढण्याचे निवेदन दिले होते. या निवेदनानंतर राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षण मिळावे यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.
 
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशावरून सुप्रीम कोर्टानेही राज्य सरकारला नाकारल्याने राज्य सरकारने केंद्राकडे धाव घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारला पत्र लिहून या विद्यार्थांसाठी कोटा वाढविण्याची मागणी करणार असल्याची माहिती मसहूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.