गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मे 2019 (17:30 IST)

सरकारी रुग्णालयात सीसीटीव्हीची नजर

डॉक्टरांवर होणारे हल्ले, यासह रुग्णालयात घडणाऱ्या इतर घटना रोखण्यासाठी राज्यातील सरकारी रुग्णालयात सीसीटीव्हीची नजर असणार आहे. ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय तसेच महिला आणि जिल्हा रुग्णालयात एकूण १३६० सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय सकाराच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. जवळपास ४ करोड २ लाख रुपये यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. राज्यातील एकूण ४९८ रुग्णालयात सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, यासाठी सरकारच्या आरोग्य विभागाने मंजुरी देखील मिळवली आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सरकारने याचा जीआर देखील काढला आहे. या सीसीटीव्ही कॅमेराची नजर रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावर, ओपीडी, छोट्या मुलांच्या कक्षात, ऑपरेशन थिएटरच्या परिसरात, कर्मचाऱ्यांच्या रूममध्ये असणार आहे. 
 
४९८ रुग्णालयात एकूण १३६० सीसीटीव्ही लागणार असून, यासाठी एकूण ४ करोड २ लाख रुपये इतका खर्च येणार आहे. यामध्ये २६६ सीसीटीव्हीची सिस्टीम खरेदी करण्यासाठी २ करोड ६६ लाख रुपये आणि १३६० कॅमेरे खरेदी करण्यासाठी १ करोड ३३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार ६ ग्रामीण रुग्णालय, २० उपजिल्हा आणि महिला रुग्णालय, परभणी येथील हाडांचे उप जिल्हा रुग्णालय १२, तसेच १०० ते २०० बेडच्या रुग्णालयात ३०, २०१ ते ४०० बेड च्या रुग्णालयात ४०, आणि ४०० बेडहून अधिक क्षमता असलेल्या रुग्णालयात ५० सीसीटीव्हीची आवश्यकता लागू शकते.