सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 27 जून 2019 (08:40 IST)

पावसाळी अधिवेशन : पदभरतीमध्ये दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने दुष्काळग्रस्त भागातील १२ जिल्ह्यामध्ये रिक्त चालक तथा वाहक पदासाठी  एकूण ४४१६ पदांसाठी व कोकण प्रदेशातील जिल्हे वगळून इतर ९ जिह्यात ३६०६ अशा एकूण ८०२२ चालक तथा वाहक रिक्त जागा भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये लेखी परीक्षेत समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचा गुणवत्ता क्रम लावताना दुष्काळ ग्रस्त जिह्यातील उमेदवारांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधान परिषद व विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. सन २०१६-१७ मधील चालक तथा वाहक पदाची वाहन चालन चाचणी उत्तीर्ण असलेल्या ९४५ व किरकोळ त्रुटींचा फेर तपासणीअंती पात्र ठरलेल्या व वाहन चाचणी उत्तीर्ण झालेल्या ८७८ असे एकूण १८२३ उमेदवारांना कोकण प्रदेशांतर्गत विभागात सामावून घेण्यात येणार असल्याचे रावते यांनी निवेदनाद्वारे सांगितले.