खासगी गाडीवर पोलीस लिहिले तर होणार कारवाई, हायकोर्टाचा निर्णय
मुंबई पोलीस, ट्राफिक पोलीस यांना त्यांच्या खासगी गाडीवर पोलिस लिहणे आणि तसा लोगो लावण्यास हायकोर्टाने पूर्ण बंदी घातली असून, जर अशी पाटी लावली तर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०१३ च्या कलम १३४ प्रमाणे संबंधीतावर कारवाई केली जाणार आहे. अनेक पोलीस आपल्या खासगी गाडीवर पोलीस किंवा लोगो लावतात तर त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी सुद्धा असे गाडीवर टाकतात. कारण त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी याचा वापर केला जातो. मात्र, आता या पुढे मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर पोलीस किंवा लोगो लावता येणार नाही. जर अशी पाटी लावलेली दिसली तर सबंधीतावर लगेच कारवाई करण्यात येणार आहे. हायकोर्टाने पोलिसांना आदेश दिले असून येत्या सात दिवसात कोणावर कारवाई केली याचा अहवाल देखील ट्राफिक मुख्यालयात सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांकडूनच पोलिसांवर कारवाई होताना पहायला मिळणार आहे. मात्र, वाहतूक पोलीस पाटी लावलेल्या वाहनांवर कारवाई करणार का असा प्रश्न आहे.