मुथूट दरोडाप्रकरणात पोलिसांना यश, मुख्य आरोपीला अटक
नाशिकमध्ये मुथूट दरोडाप्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीच्या सुरतमध्ये जाऊन मुसक्या आवळल्या आहेत. जितेंद्र बहादूर सिंग, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपी आंतरराज्यीय टोळी चालवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून 3 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. चोरलेल्या गाड्यांचे चेसी नंबर नष्ट करण्यात आले होते. त्यानंतर या गाड्या सुरतला गाडी डिलरपर्यंत पोहोचल्या जात असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. उत्तरप्रदेश, बंगाल, बिहार येथे पोलिसांचे पथक तपास करत आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये रचलेल्या या गुन्ह्यात एकूण 6 आरोपी आहेत. मुख्य आरोपी जितेंद्र सिंग याला सुरतवरुन अटक करण्यात आली.