शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2019 (09:51 IST)

"तुझ्यात जीव रंगला' तील यांना झाली अटक

तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या "तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता मिलिंद दास्ताने व त्याच्या पत्नीस चतुश्रृंगी पोलिसांनी मंगळवारी सकाळी पुण्यातील घरुन अटक केली आहे. याप्रकरणी मागील आठवड्यात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पुण्यातील औंध येथील "पीएनजी ब्रदर्स' या नामांकीत सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने, त्याची पत्नी सायली मिलिंद दास्ताने उर्फ सायली बालाजी पिसे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी "पीएनजी ब्रदर्स'च्या अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून दास्ताने दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.