बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

या एका झाडाला लागतात 40 प्रकारची फळे, किंमत मात्र विचारूच नका

तसं तर एका झाडाला एकाच प्रकारचे फळं लागतात हे सर्वसामान्य विदितच आहे. परंतू जगात एक जागा अशी देखील आहे जेथे एकाच झाडाला 40 वेगवेगळ्या प्रकाराचे फळं लागतात. ऐकून हैराण झाला असला तरी हे खरं आहे. असं झाड अस्तित्वात आहे.
 
अमेरिकेच्या एका विजुअल आर्टसच्या प्रोफेसरने असं अद्भुत झाड तयार केलं आहे ज्यावर 40 प्रकाराचे फळं लागतात. हे आगळंवेगळं झाड ट्री ऑफ 40 नावाने प्रसिद्ध आहे.
 
माहितीनुसार यावर बोर, सताळू, सफरचंद, चेरी, नेक्टराइन सारखे अनेक फळं येतात पण याची किंमत मात्र आपल्याला अजूनच हैराण करणार. ट्री ऑफ 40 ची किंमत सुमारे 19 लाख रुपये आहे.
 
अमेरिकेचे सेराक्यूज युनिव्हर्सिटीचे विजुअल आर्ट्सचे प्रोफेसर सॅम वॉन ऐकेन या विचित्र झाडाचे जनक आहे आणि हे झाडं विकसित करण्यासाठी त्यांनी विज्ञानाची मदत घेतली आहे. त्यांनी यावर 2018 मध्ये काम सुरू केले होते जेव्हा त्यांनी न्यूयॉर्क राज्य कृषी प्रयोगात एक बाग बघितले होते, ज्यात 200 प्रकाराचे बोर आणि सफरचंदाचे झाडं होते. 
 
हे ग्राफ्टिंग तकनीक वापरून करण्यात येत असल्याचे सांगितलं जात आहे. यात झाड तयार करण्यासाठी हिवाळ्यात कळ्यांसह झाडाची फांदी कापून प्रमुख झाडात भोक करून लावण्यात येते. नंतर जुळलेल्या जागांवर पोषक तत्त्वांचे लेप लावून पूर्ण हिवाळ्यात पट्ट्यांनी बांधून ठेवण्यात येतं. काही काळात फांदी झाडाला जुळून वाढू लागते.