गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जून 2019 (09:58 IST)

सकारात्मक : आईसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल

kerala-facebook-viral-post-on-congratulate-his-mother-for-her-second-marriage
सध्या सोशल मीडियावर एका तरुणाने आपल्या आईसाठी लिहिलेली एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. केरळमधील गोकुल श्रीधर असे तरुणाचे नाव आहे. गोकुळने आपल्या आईच्या दुसऱ्या विवाहानिमित्त तिला शुभेच्छा देताना ही भावूक पोस्ट लिहिली आहे. माझ्या आईने तिच्या पहिल्या विवाहामध्ये अनेक हालअपेष्टा भोगल्या. तिला शारीरिक हिंसेचा सामना करावा लागला. मात्र माझ्या पालनपोषणासाठी तिने हे सर्व काही सहन केले. आता तिचा दुसरा विवाह होऊन नव्याने संसार सुरू होत आहे, याचा मला आनंदच आहे, असे या तरुणाने मल्याळम भाषेतून लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.  
 
गोकुल आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ही पोस्ट शेअर करताना आपल्याला खूप संकोच वाटत होता, असेही गोकुल सांगतो. ''या पोस्टमधून व्यक्त केलेल्या विचारांकडे समाजातील एका वर्गाकडून योग्य दृष्टीकोनातून पाहिले जाणार नाही, असे मला वाटत होते. मात्र आपल्याला काहीही लपवण्याची गरज नाही याची जाणीव मला झाली. त्यानंतर मी माझा आनंद शेअर करण्याच निर्णय घेतला.'' गोकुलची ही पोस्ट काही वेळातच सुमारे २९ हजार जणांनी शेअर केली.