अबब! लग्नासाठी 200 हेलिकॉप्टर बुक, लग्नाचा एकूण खर्च 200 कोटी
उत्तराखंडच्या औली येथे एक असे लग्न होणार ज्यात पाहुण्यांसाठी 200 हेलिकॉप्टर बुक केले गेले आहेत. या लग्नासाठी जवळपास 200 कोटी रुपये खर्च येणार आहे. लग्नासाठी पाच कोटी किमतीचे फुलं देखील स्वित्झर्लंडहून मागवण्यात येत आहे.
या हिल स्टेशनावर पाहुण्यांसाठी फाईव्ह स्टार टेंट लावण्यात येत आहे. येथून ब्रदीनाथ, केदारनाथ दर्शनासाठी जाण्यास इच्छुक पाहुण्यांसाठी चॉपरची व्यवस्था करण्यात आली आहे.
हे लग्न आहे दक्षिण आफ्रिकेतील एनआरआय भारतीय उद्योजकांच्या दोन मुलांची. गुप्ता बंधूंमधून अजय गुप्ता यांचा मुलगा सूर्यकांत याचे लग्न 18-20 जून दरम्यान होईल तर त्यांच्या छोटे बंधू अतुल गुप्ता यांचा मुलगा
शशांकचं लग्न 20-22 जून दरम्यान होणार आहे. सूर्यकांत याचे लग्न हिरा व्यापाऱ्याच्या मुलीशी तर शशांकचे लग्न दुबईतील उद्योजकाच्या मुलीशी होणार आहे.
उत्तराखंडमधील हिल स्टेशन औली येथे सर्व हॉटेल्स, रिसोर्ट आठवड्याभरासाठी बुक करण्यात आली आहेत. लग्नात व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी सामील होत असल्याने 200 हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात आली आहेत. लग्नात अनेक बॉलीवूड आणि हॉलिवूड कलाकार देखील सामील होतील.
शाही लग्नाच्या खास गोष्टी
लग्नासाठी 100 पंडितांचे बुकिंग
लग्नाची आमंत्रण पत्रिकाही चांदीपासून बनविण्यात आली असून त्याचं वजन साडेचार किलो आहे
स्वित्झर्लंडहून पाच कोटी किमतीचे फुलं येणार
पाहुण्यांसाठी 200 हेलिकॉप्टर बुक
बॉलीवूडहून सुमारे 50 अभिनेता, लेखक, निर्माता पोहचणार
200 कोटीहून अधिकाचा बजेट
औलीमध्ये ग्रामीण हाट, जवळपास लागतील दुकान आणि स्टॉल
हाटमध्ये विकलं जाणारं सामान पाहुण्यांना मिळेल मोफत