रविवार, 7 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जुलै 2018 (16:27 IST)

उत्तराखंड, बस दरीत कोसळली १४ ठार

Uttarakhand
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात १८ जण जखमी झाले असून, त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. ही बस उत्तरकाशीहून हरिद्वारला जात असताना सुल्याधार येथे चालकाचा बसवरील ताबा सुटला व बस दरीत कोसळली. बसमधील सर्व प्रवासी देवदर्शनासाठी निघाले होते. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारने प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.    
 
उत्तराखंड परिवहन मंडळाची बस ऋषिकेश गंगोत्री महामार्गावरून जात असताना सूर्यधर येथे ही बस २५० मीटर खोल दरीत कोसळली. जखमींना दिल्‍लीतील एम्‍स रुग्‍णालयात दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्‍था करण्याचे उत्‍तराखंड सरकारने आदेश दिले आहेत.