शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सनी लिओनी हॉस्पिटलमध्ये भरती, डॉक्टरांचा रिपोर्ट

21 जून रोजी सनी लिओनीला स्प्लिट्सविला सीझन 11 च्या शूटिंग दरम्यान पोटात दुखू लागले. तिला लगेच उधम सिंह नगर (उत्तराखंड) स्थित ब्रजेश हॉस्पिटल काशीपुर हालवण्यात आले.
 
डॉक्टरांनी सनीची तपासणी केली असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. 23 जूनपर्यंत तिला हॉस्पिटलमधून सुटी मिळण्याची शक्यता आहे. डॉक्टरांप्रमाणे घाबरण्यासारखे काहीही नाही.
 
सनीच्या मॅनेजरने सांगितल्याप्रमाणे अपेंडिक्सवर उपचार झाला असून ती आता बरं वाटत आहे.
 
सेटवरील सूत्रांनुसार सनीला खूप वेदना झाल्या होत्या म्हणून तिला लगेच हॉस्पिटल घेऊन गेले आणि तिची प्रकृती ठीक आहे. तिला ऑर्ब्जवेशनमध्ये ठेवण्यात आले आहे आणि आता स्थिती नियंत्रणात आहे.
 
सनी रामनगर जिल्ह्यात शूटिंग करत होती. तिच्यासोबत को-होस्ट आणि दोस्त रणविजय सिंह देखील होते. सनी आणि टीम एका रिसॉर्टमध्ये थांबलेले होते.