मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

भारत-पाक सामन्या दरम्यान अम्मांचा व्हिडिओ व्हायरल

रविवारी वर्ल्ड कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकला पराभूत केले ज्यानंतर पूर्ण देशात आनंदी वातावरण होते. भारत-पाकिस्तान यांच्यात सामना असल्यास सर्व रोमांचित असतात. या दरम्यान सोशल मीडियावर एकाहून एक व्हिडिओ व्हायरल होत होते. यातून एक व्हिडिओ व्हायरल झालं ते एका आजीचं. यात अम्मा भारताचं कौतुक करताना दिसत आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या भारताच्या नव्हे तर पाकिस्तानातील अम्मा आहे.
 
व्हिडिओमध्ये एक महिला आजीला विचारते की पाकिस्तान चांगलं आहे की इंडिया. यावर आजीबाई अगदी वेळ न घालवता म्हणते इंडिया. त्यावर महिला जरा नाराज होऊन म्हणते अम्मा आपण पाकिस्तानात राहतो. असं म्हणू नये. आपलं देश पाकिस्तान आहे. यावर अम्मा उत्तर देते आता राहतोय पाकिस्तानात आधीतर इंडियाच होतं नं. 
 
ट्विटरवर हा व्हिडिओ पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी शेअर केलं आहे. बघता-बघता व्हिडिओ लगेच व्हायरल झालं. तरी या व्हिडिओची सत्यपणाची पुष्टी केली गेलेली नाही.