काय मुसलमानांनी रस्त्यावर नमाज पठण केलं... जाणून घ्या व्हायरल सत्य
“इस्लामिक देशांमध्ये जे चुकीचं आहे ते भारतात योग्य कसं रस्त्यावर नमाज पठण प्रतिबंधित आहे इस्लामिक देशांमध्ये तर भारतात रस्त्यावर नमाज पठणावर बंद का लागू शकत नाही. हिंदूला रस्त्यावर कोणतेही धार्मिक कार्य करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते तर या लोकांना स्वातंत्र्य का” - या मेसेजसह एक फोटो एका आठवड्यापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत शेकडो लोकं रस्त्यावर नमाज पठण करताना दिसत आहे, ज्यामुळे रस्ता ब्लॉक होऊन अनेक गाड्या त्यात अडकलेल्या दिसत आहे.
व्हायरल फोटो या कॅप्शनसह देखील शेअर केलं जात आहे- “लक्ष देऊन बघा हा फोटो ज्यात बस, कार, टॅक्सी, जीप, एम्बुलन्स आणि शाळेत जात असलेले विद्यार्थी, ऑफिससाठी निघालेले लोक, प्रवाशी, असतील, एम्बुलन्समध्ये पेशेंट असेल पण या सर्वांपेक्षा आवश्यक आहे अल्लाहची पूजा, कोणी अस्थमा, दमा, हार्ट पेशंट मेला तरी काय......... इबादत आधी.”
फॅक्ट चेक
व्हायरल फोटोत एक स्टाम्प लावले आहे- robertharding.com. आपल्या माहितीसाठी robertharding.com एक फोटो लायब्रेरी आहे. या फोटो लायब्रेरीवर आम्हाला व्हायरल फोटो देखील सापडले. याचे फोटो आयडी देखील तेच आहे, व्हायरल फोटोत दिसणारं- 858-3
परंतू या फोटोत कॅप्शन लिहिले होते - “बांगलादेशातील टोंगी येथे बिस्वा इज्तेमासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र झाल्यामुळे मुसलमान रस्त्यावर नमाज पठण करत आहे”. या कॅप्शनमुळे स्पष्ट आहे की हा फोटो बांगलादेशाचा आहे भारताचा नाही.
इज्तेमा म्हणजे काय?
इज्तेमा अरबी भाषेतील एक शब्द आहे ज्याचा अर्थ अनेक लोकांचे एकत्र येणे. उल्लेखनीय आहे की हज नंतर हे दुसरे आयोजन आहे ज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मुसलमान एकत्र होतात.
इज्तेमामध्ये धर्माची भलाई आणि प्रचार-प्रसाराबद्दल गोष्टी केल्या जातात. जगभरात प्रमुखतेने तीन जागी हा समारंभ भरतो.
मध्य प्रदेशच्या भोपाळ, पाकिस्तानच्या लाहोर सह रायविंड आणि बांगलादेशाची राजधानी ढाकाजवळ टोंगी येथे इज्तेमा आयोजन करण्यात येतं.