सापांचा राजा किंग कोब्राची त्या शेतकऱ्याने भागवली तहान व्हिडियो व्हायरल
सध्या राज्यात उन्हाची तीव्रता टोकला पोहोचली आहे. माणसासोबत अनेक प्राणी देखील पाण्याच्या शोधात फिरत आहे. पाण्याचे कमी स्त्रोत असल्याने प्राण्याचे फार हाल होत आहे. तर अनेकदा प्राणी आपला तहानेने प्राण देखील सोडतात. मात्र सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने माणुसकीचे दर्शन घडवत भूतदया दाखवली आहे. पाण्यासाठी तडफडणाऱ्या नाग राजाला पाणी देत त्याने जीवनदान दिले. सोबतच त्याला पाणी देताना व पाणी पिताना नागाचा व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल होत आहे.
शिराळा येथील शिवनी मळ्यात भर उन्हात एक नाग पाण्यासाठी तडफडत फिरत होता. हे दृश्य श्रीराम नांगरे पाटिल या शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. त्यावेळी श्रीराम यांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता उन्हाने तडफडू लागलेल्या नागाला पकडले आणि त्याच्या डोक्यावर पाणी ओतत त्याला शांत केले. त्यावेळी या नागाने फना उभारत पाणीही देखील पिले. जेव्हा त्याची तहान पूर्ण भागली तेव्हा नागाला पुन्हा सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले आहे. नागाला पाणी पिताना पाहणे हे तसे फार दुर्मिळ दृश्य आहे. यामुळे उन्हात नागाची पाण्यासाठी वनवन सोबतच शेतकऱ्याने दिलेले पाणी पिण्याची घटना याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे जंगलातील प्राण्यांना पाणी उपलब्ध करवून देणे किती गरजेचे आहे हे दिसते.