शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

स्वरा भास्करसोबत सेल्फीचा बहाणा करून बोलला- येणार तर मोदीच

बॉलीवूड कलाकार स्वरा भास्कर हल्ली निवडणूक प्रचारामध्ये दिसत आहे. ती आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असून राजकारणाबद्दल देखील अगदी मनमोकळेपणाने बोलते. मोदींविरुद्ध वक्तव्य देत ती सोशल मीडियावर चर्चेत असते. 
 
तरी अलीकडेच स्वरासोबत असे काही घडले की स्वत: हैराण झाली. ही घटना सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात व्हिडिओत एअरपोर्टवर एक चाहता स्वराला भेटायला येतो आणि तिच्यासोबत सेल्फी हवी अशी विनंती करतो. व्हिडिओ सुरू करून तो स्वराजवळ येऊन बोलतो- मॅडम.. येतील तर मोदीच.
 
यानंतर स्वरा त्याला हैराण होऊन बघते. त्या व्यक्तीने स्वराला टॅग करत तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. नंतर स्वराने देखील व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर केला. स्वराने लिहिले की एअरपोर्टवर एका व्यक्तीने सेल्फीसाठी विचारले, मी लोकांसोबत राजकारण विचारधारा या आधारावर भेद करत नसते पण त्याने चोरीने व्हिडिओत तयार केला.
स्वरा भास्करने लिहिले की असे धूर्तपूर्ण कृत्य भक्तांचा ट्रेडमार्क आहे. म्हणून मी हैराण नाही. परंतू भक्तांचे जीवन सार्थक करून मला खुशी मिळते.