मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2019 (14:12 IST)

Redmi Y3 भारतात 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होणार

सेल्फी चाहत्यांसाठी शाओमी भारतात एक नवीन फोन आणत आहे. कंपनीने याची पुष्टी केली आहे की रेडमी वाई सीरिझच्या पुढील फोनला ते 24 एप्रिल रोजी भारतात लॉन्च करण्यात येईल. या फोनमध्ये 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनच्या टीझरसाठी शाओमी “32MP Super Selfie” टॅगलाइन वापरत आहे.
 
बातमीनुसार Redmi Y3 मध्ये 32 मेगापिक्सेल ISOCELL Bright GD1 इमेज सेंसर वापरला जाऊ शकतो. यापूर्वी एका ट्विटद्वारे कंपनीने सांगितले की यात मोठी बॅटरी असेल. कंपनीने बॅटरी क्षमता किंवा फास्ट चार्जिंग सपोर्टबद्दल कोणतीही माहिती दिली नाही आहे. अहवालानुसार या फोनमध्ये 4,000 एमएएच बॅटरी असू शकते. तिथेच, Redmi च्या जनरल मॅनेजर लू विबिंगने पुष्टी केली आहे की 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेल्या रेडमी फोनवर काम चालू आहे. त्यांनी वापरकर्त्यांना फोनच्या नावाचे अंदाज लावण्यास सांगितले. म्हणूनच हे Redmi Y2 च्या अपग्रेड व्हर्जनचे संकेत देत आहे.