सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 11 एप्रिल 2019 (15:17 IST)

भारतात Huawei च्या चार कॅमेरे असणार्‍या फोनची किंमत किती?

चीनची अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी Huawei ने भारतीय बाजारात आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केला. मुख्यत: कॅमेर्‍याचा वापर आणि नवीन पिढीला लक्षात ठेवून लॉन्च केलेल्या या फोनमध्ये 4 कॅमेरे आहे. कंपनीने पी-30 प्रोची किंमत 71,990 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 
 
Huawei इंडियाचे ग्राहक व्यापार ग्रुपचे कंट्री मॅनेजर (Huawei ब्रँड) टोर्नाडो पॅन म्हणाले की स्मार्टफोनमध्ये प्रिमियम आणि नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे, या कारणामुळे त्याची किंमत एक हजार डॉलर्स म्हणजेच, 70,000 रुपये पार गेली आहे. पॅन म्हणाले की भारत आमच्यासाठी एक महत्त्वाचा बाजार आहे आणि आम्ही भारतीय बाजारात नवीन उत्पादने आणण्यासाठी कमीटेड आहोत. ते म्हणाले की Huawei भारतात आपले इतर उत्पादने सादर करण्याची शक्यता शोधत आहे.
 
कंपनीने यासह पी-30 लाइट देखील भारतीय बाजारात आणले आहे. 4 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी व्हर्जनची किंमत 19,990 रुपये तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी व्हर्जनची किंमत 22,990 रुपये आहे.