मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 9 एप्रिल 2019 (14:48 IST)

Realme 3 Pro देणार Redmi Note 7 Pro ला टक्कर

Realmi ने आधीच घोषित केले आहे की ते शाओमी रेडमी नोट 7 प्रोला टक्कर देण्यासाठी या महिन्यात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करू शकतात. या फोनचे नाव Realme 3 Pro असू शकतं. हा फोन Realme 3 चा अपग्रेड व्हर्जन असेल जो चांगल्या कॅमेरा आणि प्रोसेसरसह आपल्या समोर येईल. कंपनीच्या सीईओ माधव सेठने सोमवारी याची पुष्टी केली की या महिन्यात कंपनी दिल्ली विद्यापीठ स्टेडियममध्ये एक फोन लॉन्च करणार आहे. 
 
Realme 3 Pro चे विशिष्ट तपशील उघड झाले आहे - अहवालानुसार, हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसरसह सुसज्ज आहे जे शाओमी रेडमी नोट 7 प्रोमध्ये असलेल्या स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसरचा अपग्रेड व्हर्जन आहे. 
 
रीयलमीचा पुढील स्मार्टफोन बर्‍याच रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट्स मध्ये उपलब्ध होईल, ज्यामध्ये 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज देखील असेल. Realme 3 Pro मध्ये 48 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो. ताज्या अहवालानुसार, हा फोन Sony IMX519 कॅमेरा सेन्सरसह येईल. Redmi Note 7 Pro मध्ये 48 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे जे Sony IMX586 सेन्सरसह येते. यासह यात  फास्ट चार्जिंग फीचर देखील दिला जाऊ शकतो.