मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2019 (14:04 IST)

बेक पॅनलवर तीन कॅमेर्‍यांसह लॉन्च झाला Tecno Camon i4

Transsion Holdings ने भारतात आपला Tecno Camon i4 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल रीअर कॅमेरासह येत आहे. या स्मार्टफोनमध्ये 2जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,599 रुपये आहे.
 
तसेच 3जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज असणार्‍या व्हेरिएंटची किंमत 10,599 रुपये आहे. जेव्हा की, 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे.
 
यात 6.2 इंच HD+ डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनचा बॉडी टू स्क्रीन अनुपात 88.6 टक्के आहे. 2 जीबी आणि 3 जीबी व्हेरियंटमध्ये क्वाड कोर मिडियाटेक हेलियो A22 प्रोसेसर जेव्हा की 4 जीबी रॅम व्हेरियंटमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो P22 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या मागील भागात ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. म्हणजे, फोनच्या मागील बाजूस 3 कॅमेरे आहे, जे 13 मेगापिक्सेल, 8 मेगापिक्सेल आणि 2
मेगापिक्सलचे आहे. तिथेच, सेल्फीसाठी या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये 16MP कॅमेरा देण्यात आला आहे.