मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 एप्रिल 2019 (07:40 IST)

आयफोन एक्सआर स्वस्त

आयफोन एक्सआरची किंमत ७६,९०० रुपये असून कंपनीने दिलेल्या सवलतीनंतर त्याची किंमत ५९,९०० रुपये होणार आहे. या व्यतिरिक्त HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे फोनवर आणखी सवलत मिळाणार आहे. हे कार्ड वापरुन फोनची खरेदी केल्यास आणखी १० टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे. या कॅशबॅकनंतर आयफोन एक्सआरची किंमत ५३,९०० रुपये आहे. हा सेल ५ एप्रिल रोजी सुरू होणार असून काही वेळापुरता मर्यादित असणार आहे.
 
आयफोन एक्सआरमध्ये ६.१ इंची डिस्प्ले, १२९२ X ८२८ रेजॉलूशन, ए१२ बायॉनिक प्रोसेसर, फेसआइडी, टच टू वेकअप, ड्यूल सिम, १२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असे फीचर देण्यात आले आहेत. त्याच बरोबर ६४ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे.