मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2019 (18:21 IST)

गॅलक्सी एस10 5जी 5 एप्रिल रोजी होणार लॉन्च

बऱ्याच काळापासून सॅमसंग कंपनी आपले 5 फोन बाजारात आणण्याच्या तयारी होती, ज्यात गॅलॅक्सी एस10 (5जी) सर्वाधिक चर्चेत राहिला. कंपनीने अधिकृतपणे 5 एप्रिल रोजी फोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. तथापि ते सध्या भारतात लॉन्च होणार नाही. कंपनी हा फोन प्रथम दक्षिण कोरियामध्ये लॉन्च करण्यात येत आहे.
 
कंपनी या 5जी व्हेरिएंटवर गेल्या बऱ्याच काळापासून काम करत होती. 4जी ची अधिकतम स्पीड 100 एमबीपीएस असते, जेव्हा की 5जी 1 जीबीपीएसच्या स्पीडने काम करतो. म्हणजेच, 5जी ची स्पीड 4जी पेक्षा जवळ-जवळ 100 पट अधिक असते. या फोनमध्ये 6.7 इंच डिस्प्लेसह 8जीबी रॅम आणि अधिकतम 512 जीबी स्टोरेज असेल. 
 
या व्यतिरिक्त एक विशेष गोष्ट अशी आहे की या फोनमध्ये बॅटरी बॅकअपची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच त्यात 4500 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलक्सी एस10 5जी 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,390,000 दक्षिण कोरियन वॉन (सुमारे 84,600 रुपये) आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,550,000 दक्षिण कोरियन वॉन (सुमारे 94,400 रुपये) असू शकते.