गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : गुरूवार, 28 मार्च 2019 (17:00 IST)

सॅमसंगच्या ग्राहकांना मोठी भेट

samsung
जर आपण देखील सॅमसंगचा स्मार्ट फोन वापरता तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. सॅमसंग इंडियाने वापरकर्त्याला 12 भारतीय भाषांमध्ये मोबाइल अॅप प्रदान करण्यासाठी मंगळवारी इंडस अॅप मार्केटसह भागीदारी जाहीर केली आहे. कंपनीने जारी केलेल्या एका वक्तव्यात म्हटले आहे की टियर 2 आणि टियर 3 मार्केटमध्ये स्मार्टफोनची पोहोच आणि मोबाइल अॅप डाउनलोड्समध्ये वाढ झाली आहे. प्रमुख बाजारांमध्ये या ट्रेंडचा अभ्यास करण्यासाठी आणि इंडस ऍप मार्केटसह भागीदारी करून स्थानिक भाषेत अॅपची वाढती मागणी पूर्ण केली जाईल. 
 
या भागीदारीसह गॅलेक्सी अॅप स्टोअरवर ग्राहक इंग्रजी व्यतिरिक्त 12 भारतीय भाषांमध्ये अॅप उपलब्ध होईल. गॅलेक्सी अॅप स्टोअर इंग्रजी व्यतिरिक्त मल्याळम, तेलगू, तमिळ, उडिया, आसामी, पंजाबी, कन्नड, गुजराती, हिंदी, उर्दू, बंगाली आणि मराठीमध्ये उपलब्ध आहे.